Breaking News

वैष्णवी फाळके आणि अक्षदा ढेकळे यांनी घडविला इतिहास ; दोघींना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

Shiv Chhatrapati Sports Awards announced for Vaishnavi Phalke and Akshada Dhekale

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ -भारताच्या आंतरराष्ट्रीय हॉकी संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व मुळच्या फलटण येथील कु. वैष्णवी फाळके आणि कु. अक्षदा ढेकळे या श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाचे दोन्ही विद्यार्थीनींना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे वतीने दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे व त्याचे वितरण शासकीय कार्यक्रमात दि. १८/०४/२०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा नगरी, बालेवाडी, पुणे येथे केले जाणार आहे.

    सदरचा पुरस्कार प्राप्त होत असलेबद्दल दोन्ही विद्यार्थीनींचे अभिनंदन श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) तसेच नियामक मंडळाचे सर्व सदस्य आणि नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जाधव सर व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थीनींचे सोबतच श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण या संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी - विद्यार्थीनींनी आनंद व्यक्त करीत जोरदार अभिनंदन केले आहे.

No comments