प.पु.दादा महाराज मठामध्ये श्रीराम जन्मोत्सव व गीत रामायणाचा कार्यक्रम संपन्न
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.७ - श्रीराम नवमी निमित्त कसबा पेठ (ब्राम्हण गल्ली) फलटण येथे प.पु.दादा महाराज मठामध्ये श्री रामकृष्ण महिला भजनी मंडळ, फलटण यांनी सुश्राव्य गीत रामायणाचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर केला. श्रीराम जन्मोत्सव व गीत रामायणाचा कार्यक्रम श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी फलटण मधील प्रसिद्ध तबलावादक व आमच्या भजनी मंडळाचे मार्गदर्शक श्री.अनिकेत देशपांडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सुंदर सोहळ्यासाठी तबला वादनाची उत्कृष्ट साथ चि.प्रणव आवटे तर हार्मोनियमसाठी श्री.अनिकेत सरांची उत्कृष्ट साथ लाभली. श्री सद्गुरु दादा महाराज सेवा प्रतिष्ठान, फलटण यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी संधी उपलब्ध करुन दिली व मोलाचे सहकार्यही केले. श्रीराम कृष्ण महिला भजनी मंडळ, फलटण यांनी गीत रामायण कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे नियोजन सौ.रेवती गोसावी, सारिका गुजर, रजनी लांबोर, भाग्यश्री क्षीरसागर, मनीषा इनामदार, अंजली कालगावकर, वंदना ढाले, लीना ताथवडकर, साक्षी कुलकर्णी, वंदना जोशी, मनीषा निंबाळकर, दिपाली निंबाळकर, शिवानी चिटणीस, सीमा तगारे यांनी केले.
No comments