Breaking News

फलटण येथे सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन

 

Somnath Jyotirlinga Darshan ceremony organized in Phaltan

     फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ - फलटण येथील आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या  ज्ञानक्षेत्र फलटण येथील टी ओ के हॉल, भडकमकरनगर याठिकाणी शुक्रवार 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये शिवलिंगाचे दर्शन सर्वांसाठी उपलब्ध आहेत.

    1000 वर्षापूर्वी सोमनाथ  मंदिरावरती  प्रहार करून येथील शिवलिंग तोडले होते आणि त्यावेळी त्याचे काही अवशेष  अग्निहोत्री संत यानी जपून ठेवून  त्याला शिवलिंगाचा  आकार देऊन 1000 वर्षे पूजा केली आणि त्यावेळी कांचीचे  परमाचार्य यांनी सांगितले की हे १००० वर्ष बाहेर काढू नका आणि १०००वर्षांनंतर बैंगलोर मध्ये स्थित योग संत की परमपूज्य गुरुदेव श्री, श्री रविशंकरजी त्यांना नेऊन ते द्या आणि आता ते  गुरुदेवांच्याकडे पोहोचले आणि यावर्षी  महाशिवरात्रीला त्यांनी त्यावरती रुद्राभिषेक केला आणि आता गुरुदेव जिथे जात आहेत तिथे  रुद्राभिषेक त्यावरती होत आहेआणि तेच सोमनाथ शिवलिंग फलटण मध्ये येत आहे.

    याठिकाणी शिवलिंगावर जल अर्पण करता येणार नाही, परंतु अक्षदा, फुल जरूर वाहता येतील. यासाठी जवळून दर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल. हा दुर्मिळ संधीचा उपयोग करावा. अधिक माहितीसाठी 9970342554, 7887472019, 9881485155 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments