सुमित मोहिते यांची वरिष्ठ गट पुरुष हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निवड
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ - हॉकी इंडियाने फलटणचे सुमित मोहिते यांची वरिष्ठ गट पुरुष हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निवड केली आहे. सदर स्पर्धा 3 गटात होणार आहेत. या वर्षी क गटातील पहिले 2 संघाची, ब गटात बढती होईल. ब गटातील टॉप 2 संघाना अ गटात बढती मिळेल, ब गटातील शेवट चे 2 संघाची, क गटात उतरणी होणार, अ गटातील शेवटच्या 2 संघाची ब गटात उतरली होणार.
सुमित मोहिते यांनी अनेक सीनिअर व ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा, खेलो इंडिया, नॅशनल हॉकी स्पर्धा, सुलतान जोहोर कप मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत अंपायर (पंच) म्हणुन काम पाहिले आहे. सुमित मोहिते हे हॉकी इंडिया तर्फे अनेक पंच शिबिर मध्ये प्रशिक्षक म्हणुन काम पाहत आहेत, तसेच अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच प्रमुख म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे . सुमित मोहिते यांना मुंबई कस्टम विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच क्रीडा विभाग, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिरकी , सेक्रेटरी जनरल भोलानाथ सिंह, ऑलिंपियन राहुल सिंह, हॉकी महाराष्ट्रचे प्रमुख आयपीएस कृष्णप्रकाश सर, सेक्रेटरी मनीष आनंद, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे , मुंबई कस्टम हॉकी संघ तसेच फलटण येथील सर्व आजी - माजी हॉकी खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले.
No comments