तालुक्याच्या विकासाचा ३५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार - मा. खा. रणजितसिह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ - आज महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक निसर्ग हाटेल सुरवडी येथे पार पडली, यावेळी आमदार सचिन पाटील ,ज्येष्ट नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलिपसिह भोसले, विश्वासराव भोसले, जयकुमार शिंदे, माणिकराव सोनवलकर, विक्रम भोसले, मनिषाताई पांडे, अँड नरसिह निकम, विलासराव नलवडे, दत्ताभाऊ धुमाळ, शहाजीतात्या भोईटे, विविध आघाड्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी फलटण तालुक्यातील भाजपचे तीन मंडल अध्यक्ष अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विकास शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी बोलताना मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, नुतन पदाधिकाऱ्यांनी भाजपचे विचार गावागावात पोहचावे व जनतेची चांगले काम करावेत. विरोधकांनी ३५ वर्ष या तालुक्यातील जनतेला विकासापासुन दूर ठेवले, त्यामुळे मला या तालुक्याचा अर्थिक, सामाजिक ,राजकीय बॅकलॉग भरून काढायचा आहे. तालुक्यातील शेतीचा इंच ना इंच ओलिताखाली आणायचा आहे. इच्छाशक्ती असल्या नंतर हक्काचेच नाहीतर त्या पेक्षाही जास्त पाणी तालुक्यात आणणार आहे. त्यासाठी मला तीस वर्षांची गरज नाही. येत्या आठ दिवसांत जिल्हा परिषद गटामध्ये बैठका घेऊन, प्रत्येक वाडी, वस्ती वर जाऊन उर्वरित काम समजुन घेऊ व मार्गी लावले जाईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेच्या सेवेत राहावे, लोकांच्या सुखदुःखात सामील व्हावे अश्या सुचना केल्या.
यावेळी दिलिप सिंह भोसले यांनी मार्गदर्शन केले. मावळते तालुकाध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रास्ताविक व आभार बजरंग गावडे यांनी मानले.
No comments