Breaking News

लक्ष्मीनगर, फलटण येथून दुचाकी चोरीला

Two-wheeler stolen from Laxminagar, Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - लक्ष्मीनगर फलटण येथे घराच्या गेट समोर लावलेली दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, प्रदिप सुनिल सुळ,वय 25, मुळ रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण सध्या राहणार पाचबती चौक फलटण यांनी दि. 22/04/2025 रोजी रात्रौ 9.30 वाजता ते रात्रौ 9.45 वाजण्याच्या दरम्यान, जलमंदिर शेजारी लक्ष्मीनगर, फलटण, ता. फलटण, येथे राहणाऱ्या आदेश सोमनाथ सरक या मित्राच्या, रुमचे गेटचे समोर हँण्डल लॉक करून लावलेली, 30,000/- रुपये किंमतीची  काळ्या रंगाची  होंडा सीबी शाईन कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच 42 व्ही 6846  ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली फिर्याद प्रदीप सूळ यांनी दिली आहे. अधिक तपास म.पो.हवा. माधवी बोडके या करीत आहेत.

No comments