मा. खा. रणजितसिंह यांच्या नेतृत्त्वाखाली फलटणची बारामती झाल्या शिवाय रहाणार नाही - अशोकराव जाधव
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - फलटण शहरात मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली कधी नव्हे एवढा विकास चालू आहे, साहजिक जेव्हा डेव्हलपमेंट चालु असते, तेव्हा थोडा त्रास सहन करावाच लागतो, पण विरोधकांना आयते कोलीत घेऊन नाचायची सवय झाली आहे,
गेल्या अडीच ते तीन वर्षांत कोट्यावधी रुपयांचा निधी फलटण शहर व तालुक्यात आणण्यात रणजितदादा यशस्वी झाले आहेत, त्याची कामे चालू आहेत, नगर परिषदे शेजारी भव्य दिव्य आणि देखणे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे रहात आहे, त्याच्या खोदकामाची माती रस्त्यावर सांडणार नाही तर ती कुठे सांडणार पण त्याचा बाऊ करून लगेच बोम्बा बोंब चालू झाली आहे, प्रत्यक्षात शॉपिंग कॉम्प्लेक्स, आद्यावत महिला जिम, स्विमिंग पूल, स्टेडियम, तारांगण, पालखी रोड, रिंग रोडचे सुशोभीकरण, फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन चे इमारती, नवीन प्रशासकीय भवन, नविन जिल्हा न्यायालयाची इमारत, नविन वारकरी भवन अशी अनेक कामे मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे माध्यमातून चालू आहेत, ती कामे फलटण शहराचा चेहरा मोहरा बदलणारी असणार आहेत.
त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठलेला आहे, थोडे थांबा फलटण शहराची नविन ओळख निर्माण होत आहे, त्यात सर्व फलटणकर नागरिकांनी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पाठीशी खंबीर उभे राहावे असे आवाहन माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले.
No comments