श्रीमंत महारुद्र पंचमुखी हनुमान मंदिर जाधववाडी येथे हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ - श्रीमंत महारुद्र पंचमुखी हनुमान मंदिर, नाळेमळा, अक्षत रेसिडेन्सी, अष्टविनायक नगर जाधववाडी ता.फलटण येथे जाधववाडी ग्रामस्थांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने दिनांक १० एप्रिल २०२५ ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये गुरुवार १०/०४/२०२५ सायंकाळी ०७:०० ते १०:०० वाजेपर्यंत ह.भ.प.श्री. संतोष महाराज पुजारी कडवेकर ता. पाटण जि. सातारा यांचे एकपात्री संगीत विनोदी भारूड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ११/०४/२०२५ सायंकाळी ०७:०० ते ०९:०० भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार १२/०४/२०२५ पहाटे ०५:०० ते ०६:०० भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ६.१५ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
Post Comment
No comments