Breaking News

स्पीड कंट्रोल करता न आल्याने वॅगनआरचा अपघात ; एक ठार 4 जखमी

WagonR accident due to speed control; one killed, 4 injured

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - फलटण - लोणंद रोडवर नायरा पेट्रोल पंपाच्या समोर असणाऱ्या कॉर्नरला, वॅगनआर चालकाला वेग कंट्रोल करता न आल्यामुळे चार चाकी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर चालकासह इतर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडे मिळालेले माहितीनुसार,  दि.23/04/2025 रोजी पहाटे 05.30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी किशोर कदम, वय 43 वर्षे,  रा.जय महाराष्ट्र बिल्डींग, 7 वा मजला, रूम नं.708, शास्त्रीनगर, धारावी, मुंबई, मुळ रा.झरे, ता.आटपाडी, जि.सांगली या आपल्या कुटुंबासमवेत वॅगनआर गाडीत लोणंदच्या दिशेने चालल्या होत्या. लोणंद फलटण रोडवरील नायरा पेट्रोल पंप, फलटणचे समोर गाडी आली असता, लक्ष्मी किशोर कदम यांच्या चारचाकी कारवरील चालक मनोज वसंत शिवडीकर यांनी सदरची गाडी भरधाव वेगात चालवून, गाडी कंट्रोल झाली नसलेने रस्त्यावरील वळणावर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन, आपटून, अपघात होऊन लक्ष्मी किशोर कदम यांचा  मुलगा रियांश, पुतणी प्रणाली यांच्या किरकोळ व गंभीर दुखापतीस तसेच  व लक्ष्मी किशोर कदम यांचे  पती किशोर परशुराम कदम यांच्या  मृत्यूस व स्वत:चे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला आहे.  वॅगन आर गाडी चालक मनोज वसंत शिवडीकर  वय 45 वर्षे, रा. शास्त्रीनगर, मेन रोड धारावी मुंबई याच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम हे करत आहेत.

No comments