फलटण तालुक्याच्या ०.९३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांचे बैठकीचे निर्देश ; मा.खा.रणजीतसिंह यांच्या मागणीला यश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ - माढा लोकसभा मतदार संघातील जलसिंचन प्रकल्प व पाणी प्रश्नाबाबत बैठक आयोजित करणेबाबत तसेच नीरा देवघर कालव्यात धोम बलकवडी कालव्यामध्ये सोडण्यात येणारे फलटण तालुक्याचे ०.९३ टीएमसी पाण्याचे उपसासिंचनाचे नियोजन करणेबाबत माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले असून, बुधवार, दिनांक १६/०४/२०२५ रोजी दुपारी १२.२० वाजता परिषद सभागृह क्र.०५, ७ वा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. या बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, कार्यकारी संचालक (कृष्णा खोरे विकास महामंडळ), मुख्य अभियंता (कृष्णा खोरे विकास महामंडळ) व या विषयाशी संबंधित सर्व मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
No comments