Breaking News

तरडफ येथे विहिरीत पडलेल्या रान गव्याला जीवदान

Wild cow rescued from well in Tardaf

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.७ - तरडफ, तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे नर जातीचा रान गवा (Indian Gaur) हा वन्य प्राणी विहिरीमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्याचे वजन अंदाजे एक टन इतके होते. यावेळी तेथील ग्रामस्थांनी वनखात्याशी संपर्क साधल्यानंतर, वन विभाग,फलटण यांच्यासह नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी फलटण,रेस्क्यु बारामती या संस्थां तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या रानगव्याला विहिरीमधुन सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले व वनखात्यातील वैद्यकीय अधिकारी व फलटण वनविभागातील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणामध्ये तपासणी करून मुक्त करण्यात आले.

    याप्रसंगी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, अश्या प्रकारचे वन्यजीव जखमी किंवा विहिरीमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा संस्थेशी संपर्क साधावा 
संपर्क क्र: 02166226979, 7588532023

No comments