बस मध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण पट्टी चोरीला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - एस.टी.स्टँड, फलटण येथे फलटण ते गोंदवले या एस.टी. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन दहा ग्राम सोन्याची गंठणपट्टी चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सौ. आश्विनी रविंद्र कदम वय 50 वर्षे व्यवसाय-घरकाम रा म्हसवड ता माण या दिनांक 26/03/2025 रोजी सकाळी 9.45 वा. चे सुमारास एस.टी.स्टँड, फलटण, ता. फलटण, जि. सातारा येथे फलटण ते गोंदवले या एस.टी. बसमध्ये चढत असताना, कदम यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण कोणीतरी अज्ञात व्यक्ती चोरत असलेसारखे त्यांना जाणवले, म्हणुन सौ कदम यांनी गंठणला हात लावुन पाहीला असता, गळ्यातील गंठणचा अर्धा तुकडा व सोन्याचे चार मणी, दोन वाट्या असे त्यांच्या हातात आले व अर्धी गंठणची सोन्याची पट्टी दिसली नाही. गर्दीचा फायदा घेऊन, 60,000/- रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याच्या गंठणची काळ्या मण्यातील अर्धी पट्टी तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असल्याची फिर्याद सौ कदम यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
No comments